सिनेअभिनेत्री तमन्ना भाटिया व सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग व व्यवसाय क्षेत्रात करिअर घडविण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करणारे उद्योगगुरू रविराज भालेराव यांना एमएसएमई भारत बिझनेस अवॉर्ड 2023 जाहीर झाला आहे. मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेअभिनेत्री तमन्ना भाटिया व मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते एमएसएमईच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भालेराव यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संपूर्ण भारतातून फक्त तीनच व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रविराज भालेराव युवकांमधून उद्योजक घडविण्यासाठी कार्य करत आहे. उत्कृष्ठ शार्प इंजिनीअरिंग वर्क्स, शार्प बीजेनेस कन्सल्टन्सी व ट्रेनिंग इन्स्टिटयूटच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायिक प्रशिक्षण देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
