शारदीय नवरात्र उत्सवाचा उपक्रम
मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे शालेय विद्यार्थिनींचा गरबा-दांडीया नृत्य रंगला होता. नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ विद्यालय, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शालेय विद्यार्थिनी दांडियाच्या तालावर थिरकल्या. तर या उपक्रमातून मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश देण्यात आला. पारंपारिक वेशभुषा परिधान करुन विद्यार्थिनींनी दांडियाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी तृप्ती वाघमारे, मंदा साळवे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे, प्रमोद थिटे, अमोल वाबळे आदी उपस्थित होते.

दांडिया नृत्याच्या कार्यक्रमात युवतींचा उत्साह संचारला होता. युवतींनी ग्रुपने दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. शालेय मुलींसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. माजी सरपंच साहेबराव बोडखे यांनी कार्यक्रमास भेट देऊन नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या दांडिया नृत्य कार्यक्रमात स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने उत्कृष्ट वेशभूषा इयत्ता दहावी व बेस्ट नॉन स्टॉप डान्सर भाग्यश्री रोहोकले यांना बक्षीस जाहीर करण्यात आले. तसेच पै. नाना डोंगरे यांनी मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या विषयावर व्याख्यानात समाजात स्त्री शक्तीचे महत्त्व सांगितले.
