• Sun. Nov 2nd, 2025

ज्ञानसाधना गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

ByMirror

Oct 18, 2023

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे कार्य कौतुकास्पद -मनोज कोतकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवरात्र उत्सवानिमित्त अजितदादा कोतकर युवा मंच व अरिहंत कंन्स्ट्रक्शनच्या वतीने वक्तृत्व, चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये ज्ञानसाधना गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. वक्तृत्व स्पर्धेत भाग्यश्री चेमटे, चित्रकला स्पर्धेत वर्षा शिंदे तर निबंध स्पर्धेत पूर्वा ढोरसकर यांनी यश संपादन केले.


या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. स्पर्धेचे बक्षीस वितरण नगरसेवक मनोज कोतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक जालिंदर कोतकर, अनिल ठुबे, पत्रकार विक्रम लोखंडे, बबन मतकर, छबुराव कोतकर, रवी टकले, सचिन घेंबुड, प्रा. शाहरुख शेख, ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.


नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस मध्ये मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या कला-गुणांना वाव दिला जात आहे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेच्या माध्यमातून चालना देऊन त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


विक्रम लोखंडे यांनी स्पर्धेत उतरल्याशिवाय स्वत: मधील कौशल्य ओळखता येत नाही. स्पर्धा ही स्वत:ला सिध्द करण्याचे सर्वोत्तम व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. प्रसाद जमदाडे यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांच्यात कला व कौशल्य विकसीत केले जात असल्याचे स्पष्ट केले. उपस्थित पाहुण्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *