हजरत जलालशाह मजलीस कमिटीचे अध्यक्ष समीर शेख यांचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील हजरत जलालशाह मजलिस कमेटीचे अध्यक्ष समीर शेख यांच्या पुढाकाराने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त सर्जेपुरा रामवाडी येथे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. तर मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कमिटीच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविले जात असल्याची माहिती समीर शेख यांनी दिली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते नसीर (लाला ) शेख, नगरसेवक मुदस्सर शेख, रिपाई शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, रिपाई शहर कार्यध्यक्ष दानिश शेख, कुणाल डाके, वसीम पटेल, शहेबाज शेख, शाहिद शेख, सुफियान शेख, अरबाज शेख, साहिल शेख, इरफान शेख फैझान शेख, तोहीद शेख अयान शेख, शाहरुख शेख, जारा शेख, मन्नान खान, अयान खान, जिशान शेख, अनिस शेख, सोहेल शेख आदी उपस्थित होते.
