• Sun. Nov 2nd, 2025

नेप्ती गाव जलसमृध्द करून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार -संजय जपकर

ByMirror

Oct 2, 2023

नेप्तीत मिशन जल जीवन योजनेच्या कामाचे भूमिपूजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये भीषण जलसंकट उभे राहते. पाणी टंचाईचा सर्वाधिक त्रास महिलांना व शालेय मुला-मुलींना सहन करावा लागतो. महिलांना व मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मात्र केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतंर्गत नेप्ती गाव जलसमृध्द होऊन महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे. तर ग्रामस्थांची पाणीटंचाई कायमची संपणार असल्याची असल्याचे प्रतिपादन उपसरपंच संजय जपकर यांनी केले.


नगर तालुक्यातील नेप्ती येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी व हर घर नळ योजनेच्या कामाचे भूमिपूजन माजी सरपंच विठ्ठल जपकर व उपसरपंच संजय जपकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, सरपंच संजय अशोक जपकर, माजी उपसरपंच शिवाजी होळकर, रामदास फुले, ग्रामपंचायत सदस्य फारुक सय्यद, संभाजी गडाख, बाबासाहेब होळकर, दादू चौगुले, एकनाथ जपकर, बंडू जपकर, उत्तम फुले, माजी मार्केट कमिटीचे सदस्य वसंत पवार, ग्रामसेवक लालभाई शेख, शशी होळकर, रामदास कोल्हापुरे, जालिंदर शिंदे, प्रा. एकनाथ होले, प्रदीप जपकर, नसीर सय्यद, माजी सरपंच दिलीप होळकर, अशोक जपकर, मच्छिंद्र जपकर, ज्ञानेश्‍वर जपकर, अतुल जपकर, गोरख जपकर, माजी सरपंच सुधाकर कदम, नितीन कदम, संबाजी कांडेकर, सुरेश कदम, पोलीस पाटील अरुण होले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे जपकर म्हणाले की, ग्रामीण भागातील माता-भगिनींना पाण्यासाठी होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन जलजीवन अभियानाची सुरुवात केली. हर घर जल! हा नारा देऊन येणाऱ्या काळात कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही. गाव जलसमृध्द करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.


नेप्ती गावाला जलजीवन मिशन अंतर्गत नल पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून दोन पाण्याच्या टाक्या तसेच गावठाण व वाडी-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. नेप्तीतील वाड्या वस्तीवरील अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *