तर श्रमदानातून केला शालेय परिसर चकाचक
सर्वांनी योगदान दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकारले जाणार -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरू युवा केंद्राच्या स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वच्छता अभियान राबवून श्रमदान करण्यात आले. नवनाथ विद्यालयाच्या परिसरात घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. तर पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या व देशापुढे मोठी समस्या असलेल्या विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्तीची शपथ देण्यात आली.
या अभियानात डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, ज्येष्ठ शिक्षक निळकंठ वाघमारे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तृप्ती वाघमारे, अमोल वाबळे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, तेजस केदारी, प्रमोद थिटे, भानुदास लंगोटे, राम जाधव, प्रियंका डोंगरे-ठाणगे, मंदाताई डोंगरे, लहानबा जाधव सहभागी झाले होते.

सकाळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी हातात झाडू घेऊन स्वच्छतेला प्रारंभ केले. शाळेचा परिसराची स्वच्छता करुन, श्रमदानाने परिसरात वाढलेला गवत, काटेरी झाडे-झुडपे हटविण्यात आली. आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व व प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी याबद्दल विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, श्री नवनाथ युवा मंडळाच्या माध्यमातून वर्षभर सार्वजनिक स्वच्छतेसाठी कार्य करुन समाजात जागृती केली जात आहे.
महापुरुषांचे जयंती, सण-उत्सवात स्वच्छता अभियान राबवून निरोगी आरोग्याचा जागर करण्याचे काम सुरु आहे. निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, सर्वांनी योगदान दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.
