चौथ्या वर्धापन दिनाचा उपक्रम; सामाजिक संस्थाचा होणार गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपच्या वतीने शुक्रवारी (दि.29 सप्टेंबर) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्टेट बँक कॉलनी, प्रेमदान चौक, सावेडी येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. तर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थाचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दिवशी संस्थेच्या कामाचा लेखा-जोखा सर्वां समोर मांडण्यात येणार आहे. तर पुढील वाटचालीची दिशा ठरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब (नाना) भोरे यांनी केले आहे.
