अवघ्या 5 मिनीटात विद्यार्थ्यांनी सोडवले गणिताचे पेपर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवित अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले. ही स्पर्धा केजी, ज्युनिअर, मास्टर ज्युनिअर, लेवल 1 ते 7 व वैदिक मॅथ्स या गटात पार पडली. 5 मिनीटाच्या राऊंडमध्ये अवघड गणिती प्रक्रियेचे पेपर विद्यार्थ्यांनी अत्यंत जलदगतीने सोडविली.
दुपारच्या सत्रात पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात प्रमुख उस्थितीमध्ये कृषी अधिकारी प्रसाद भोसले, मराठी चित्रपटाचे असीस्टंट डायरेक्टर रवीण करडे, सनराईज स्कूलच्या प्राचार्या राजश्री शिंदे, ब्लू डायमंड स्कूलच्या प्राचार्या सौ. डोंगरे, योगेश इथापे, युनिव्हर्सल अबॅकसच्या उपाध्यक्षा हेमलता काळाणे, श्रीगोंदाच्या नगरसेविका सिमाताई गोरे, ज्योतीताई खेडकर, विवेक रणभोर आदी उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत सुनिल काळाणे यांनी केले. प्रास्ताविकात हेमलता काळाणे यांनी अबॅकस फक्त गणित विषया पुरता मर्यादीत नसून, यामुळे विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना मिळते. अबॅकसमध्ये पारांगत झालेला विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षेतही आपली गुणवत्ता सिध्द करीत असल्याचे सांगितले. तर वैदिक मॅथ्सची माहिती दिली.
राजश्री शिंदे म्हणाल्या की, स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षणाची गरज आहे. स्पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय आहे. अबॅकसने मोठ-मोठ्या गणिताची प्रक्रिया काही क्षणातच सोडविता येते. तर मुलांचा उजचा व डावा मेंदू कार्यान्वीत होवून कुशाग्र बुध्दीमत्तेने मुले आपला विकास साधतात. अबॅकसने मुलांमध्ये एकाग्रता, वैचारिक गती व गुणवत्ता वाढीस लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध गटात झालेल्या स्पर्धेत शौर्य कवडे, समृद्धी चव्हाण, अदिती कानडे, आर्यन फल्ले, उत्कर्षा वाघुले, प्रथमेश भिसे, आयुषी छाब्रिया, चिन्मई कविटकर, अमित कडू, श्रावणी लकडे यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी पटकाविली. तर प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋग्वेदि काकडे यांनी केले. आभार स्वाती घुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर लकडे, संतोष काकडे, आढाव सर, गोरे सर, घालमे, सचिन काळाणे आदींसह सर्व असोसिएशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
