निराधार व अनाथ मुलांसाठी गरजेच्या इलेक्ट्रिक वस्तूंची भेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील मैत्री प्रतिष्ठान ट्रस्ट संचलित संघर्ष तरुण मंडळाने यावर्षी निराधार व अनाथांचा सांभाळ करणाऱ्या सावली संस्थेला गरजेच्या इलेक्ट्रिक वस्तूंची भेट देण्यात आली. तर गोशाळेस चारा वाटप करण्यात आले. यावर्षी मंडळाने देखावा, सजावट व डिजेच्या खर्चाला फाटा देवून हा सामाजिक उपक्रम राबविला. तर पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुक काढून गणरायाला निरोप देण्यात आला.
मैत्री प्रतिष्ठान ट्रस्ट संचलित संघर्ष तरुण मंडळ दरवर्षी गणेशोत्सवात धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवित असतो. यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे देखावा व सजावट करण्यात आली नाही. या पैश्यातून मंडळाने अनाथ विद्यार्थ्यांना मदतीचा आधार देवून त्यांच्यासाठी संस्थेत आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रिक वस्तूंची भेट देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य ॲड. अक्षय भांड, पियुष भंडारी, निलेश शिंगवी, मच्छिंद्र ताठे, तुषार कदम, संदीप भांड, विनीत रासकर, प्रसाद कहाणे, व्यंकटेश पतके, दीपक कर्डिले, महेश कवेकर उपस्थित होते.
ॲड. अक्षय भांड म्हणाले की, समाजातील निराधार व अनाथ बालके ही समाजातील घटक असून, त्यांना दिशा व आधार देण्याची सर्वांची जबाबदारी आहे. हा गणेशोत्सवात त्यांना मदत देवून मोठा समाधान मिळाले असून, ही मदत सत्कर्मी लागल्याचे त्यांनी सांगितले. तर मंडळाच्या वतीने धार्मिक सण-उत्सवांना सामाजिक उपक्रमाची जोड दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
