शिवराज्याभिषेक सोहळा 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त देखाव्यातून महाराजांना मानाचा मूजरा
मंडळाचे कार्यकर्ते खरे शिवसैनिक असल्याचे देखाव्यातून दाखवून दिले -नरेंद्र फिरोदिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त शहरातील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त शिवराज्याभिषेक सोहळा (शिवरायांचा राज दरबार) हा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यातून महाराजांना मानाचा मूजरा करुन शिवाजी महाराजांचा जयघोष करत देखावा खुला करण्यात आला.


या देखाव्याचे उद्घाटन शशिकला अनिलभैय्या राठोड व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. उद्घाटन सोहळ्यासाठी युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, मूर्तिकार प्रमोद कांबळे, बबलू मुनोत, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर, उपाध्यक्ष किरण डफळ, कार्याध्यक्ष अजय दराडे, दिनेश मंजरतकर, नरेश चव्हाण, सचिन नराल, सुरेश म्याना, वरूण मिस्कीन, सोमनाथ लगडे, विकी मेहेरा, प्रितेश डफळ, महेश सब्बन, प्रथमेश संभार, सुमित गोसके, मयूर चीलवर, ओम संभार, जस्मितसिंह राजपूत, नंदू बिद्रे, लोटके बंधू, योगेश राऊत आदींसह मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान गणेश उत्सवाबरोबरच वर्षभर विविध लोकोपयोगी कार्य करत असतो. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. या देखाव्यातून मंडळाचे कार्यकर्ते खरे शिवसैनिक असल्याचे त्यांनी दाखवून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
विक्रम राठोड म्हणाले की, बागडपट्टीचा राजा मागील वीस वर्षापासून शहरात भव्य देखावे साकारत आहे. मंडळाला सामाजिक उपक्रमांची परंपरा असून, वर्षभर विविध उपक्रम सुरु असतात. छत्रपतींचा वैचारिक वारसा मंडळ पुढे घेऊन जात आहे. तर त्याच विचाराने कार्य सुरू असल्याचे स्पष्ट करुन उत्कृष्ट देखाव्याचे त्यांनी कौतुक केले.
दिलदारसिंग बीर यांनी गेल्या 21 वर्षापासून मंडळ धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात योगदान देत आहे. शहरातील भव्य देखावा साकारण्याची परंपरा सुरु असल्याचे सांगून विविध उपक्रमाची माहिती दिली.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या देखाव्यात शिवाजी महाराजांच्या दरबारातील विविध पैलू, दरबारातील उपस्थिती व त्याची भव्यतेचा उगडा करण्यात आला आहे. हा भव्य देखावा पहिल्याच दिवसापासून भाविकांचे लक्ष वेधत असून, देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. तर राज दरबारापुढे युवक-युवतींना छायाचित्र घेण्याचा मोह आवरत नाही. या देखाव्याची सकल्पना व सजावट करणारे दिनेश मंजरतकर व राकेश मुनगेल यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
