लिओच्या पदग्रहण सोहळ्यात युवक-युवतींचा सामाजिक कार्यासाठी पुढाकार
आंचल कंत्रोड हिने अध्यक्षपदाची तर धारवी पटेल हिने सचिवपदाची स्विकारली सूत्रे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्सच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी पुढे सरसावलेल्या युवक-युवतींच्या लायन्स लिओ क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. लिओ क्लबच्या नुतन पदाधिकारी व सदस्यांनी वंचितांसाठी मदतदूत म्हणून कार्य करण्याचा संकल्प केला.
शहरात पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्यात आंचल कंत्रोड यांनी अध्यक्षपदाची तर धारवी पटेल हिने सचिवपदाची सूत्रे मावळते पदाधिकारी हरमनकौर वधवा व अनया बोरा हिच्याकडून स्विकारली. अरमान खंडेलवाल याने खजिनदार पदाची शपथ घेतली. पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रिजन चेअरमन सुधीर डागा, झोन चेअरमन हरिश हरवानी, लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष धनंजय भंडारे, उद्योजक जनक आहुजा, हरजीतसिंह वधवा, लिओ सल्लागार डॉ.सिमरनकौर वधवा, प्रणिता भंडारी आदींसह लायन्स व लिओचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुधीर डागा म्हणाले की, स्वतः आनंदी जीवन जगत असताना, इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या युवक-युवतींमध्ये लायन्सचे सेवाभावी कार्याचे संस्कार रुजवले गेले आहे. लायन्सने सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण करुन युवकांमध्ये प्रेरणा निर्माण केली आहे. सामाजिक कार्यासाठी युवा पिढीला सज्ज करुन भविष्यात सामाजिक दिशा देण्याचे कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. युवा शक्तीने परिवर्तन शक्य असून, युवकांमध्ये नेतृत्व क्षमता विकसित करण्याचे कार्य केले जात असल्याचे स्पष्ट करुन नुतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्याची जबाबदारी समजावून सांगितली.

प्रारंभी रुचिता कुमार हिने गणेश वंदना सादर केली. पाहुण्यांचे स्वागत करुन मावळत्या अध्यक्षा हरमनकौर वधवा यांनी मागील वर्षी केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल सादर केला. हरिश हरवानी व धनंजय भंडारे यांनी सामाजिक कार्यासाठी युवक-युवतींनी पुढे येणे, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे स्पष्ट करुन नुतन पदाधिकाऱ्यांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. लिओच्या कार्यकारणीत दिशा तलवार, गुरनूर वधवा, ओम भंडारी, लतिका भल्ला, हर्ष किथानी, प्रीत कंत्रोड, युक्ती देसर्डा, रुचिता कुमार यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमासाठी सनी वधवा, गगनप्रीत वधवा, नरेंद्र कुरलेकर (कोपरगाव), बाळासाहेब जोरी, अमिता कंत्रोड, तनु कंत्रोड, तृप्ती खंडेलवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरनूर वधवा व युक्ती देसर्डा यांनी केले. आभार दिशा तलवार हिने मानले.
