शहरासह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने पटकाविला सांघिक करंडक
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेजमध्ये वाद-विवाद स्पर्धेने हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वाद-विवाद स्पर्धेत शहरासह जिल्ह्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेचा सांघिक करंडक भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने पटकाविला.

सदर कार्यक्रम उद्घाटन व बक्षिस वितरण अशा दोन सत्रात पार पडले. प्रारंभी पहिल्या सत्रात अशोकभाऊ फिरोदिया व शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे परीक्षक व प्रमुख पाहुणे डॉ. पौर्णिमा बेहरे व तुषार देशमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. सल्लागार समितीचे सदस्य भूषण भंडारी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.

डॉ. पौर्णिमा बेहरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडा. लक्ष साध्य करण्यासाठी स्वत:ला झोकून द्या व निरीक्षणातून शिकण्याचा कानमंत्र दिला. पाहुण्यांचा परिचय रुबिना शेख यांनी करुन दिला. स्पर्धेत विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी हिंदीतून आपले विचार मांडले. उद्घाटन सत्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती हिंगे यांनी केले. आभार विद्या यादव यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विश्वस्त सुनंदाताई भालेराव, सल्लागार समिती सदस्य भूषण भंडारी, परीक्षक डॉ. पौर्णिमा बेहरे, तुषार देशमुख, मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, विभाग प्रमुख वैशाली वाघ, रेखा शर्मा, अश्विनी रायजादे, कांचन कुमार आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत प्रथम- अक्षरा जैन (सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट), द्वितीय- पृथा भोईटे (रामकृष्ण एज्युकेशन सोसायटी), तृतीय- सिद्धी घाणेकर (भाऊसाहेब फिरोदिया), उत्तेजनार्थ- सिद्धी गायकवाड (अशोकभाऊ फिरोदिया), समर्थ गागरे (साई एंजल्स हायस्कूल) यांनी बक्षीस पटकाविली. 
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती हिंगे यांनी केले. आभार विद्या यादव यांनी मानले.
