टेकाडे मळा येथे बैल जोडीचे पूजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-दौंड महामार्गावरील खंडाळा (ता. नगर) येथे श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. दुष्काळाचे व लंपी आजाराच्या सावट असताना देखील शेतकऱ्यांनी बैलपोळा थाटात साजरा केला. बैलांना आकर्षक सजवून गावातून ढोल, ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत जंगी मिरवणुक काढण्यात आली होती.
प्राचार्य शिरीष टेकाडे कुटुंबीयांच्या वतीने टेकाडे मळा येथे शेतकाऱ्यांचा कामधेनू असलेल्या बैलांची पूजा करुन त्यांना पुरणपोळीचा नैवद्य देण्यात आला. ठिकठिकाणी बैल पूजनानंतर गावातून मिरवणुकीला प्रारंभ झाले होते. मारुती मंदिरा समोर शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना घेवून दर्शनासाठी गर्दी केली होती.
