• Tue. Jan 13th, 2026

तारकपूर येथे सेवाभावी लायन्स डेंटल क्लिनिकचा लोकार्पण

ByMirror

Sep 13, 2023

गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात मिळणार सेवा

सामाजिक संवेदना जागृत ठेवून लायन्सचे कार्य -शरद मुनोत

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने सर्वसामान्य गरजू नागरिकांसाठी तारकपूर येथे सेवाभावाने उभारण्यात आलेल्या लायन्स डेंटल क्लिनिकचा लोकार्पण करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक शरद मुनोत यांच्या हस्ते या क्लिनिकचा शुभारंभ झाला. या क्लिनिकच्या माध्यमातून गरजू नागरिकांना दंत विकारावर सर्व प्रकारच्या उपचार सुविधा अल्प दरात उपलब्ध होणार आहेत.


या कार्यक्रमासाठी लायन्सचे विभागीय अध्यक्ष सुधीर डागा, झोन चेअरपर्सन हरिष हरवानी, लायन्स क्लबचे अध्यक्ष धनंजय भंडारे, सचिव दिलीप कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख डॉ. संजय असनानी, खजिनदार नितीन मुनोत, लिओ अध्यक्षा आंचल कंत्रोड, अरविंद पारगावकर, माजी अध्यक्षा सिमरनकौर वधवा, आनंद बोरा, डॉ. अमित बडवे, जनक आहुजा, राजबीरसिंह संधू, विजय कुलकर्णी, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कांत्रोड, जस्मीतसिंह वधवा, प्रिया मुनोत, प्रशांत मुनोत, सहेजकौर वधवा, महेश पाटील, सनी वधवा, संतोष माणकेश्‍वर आदींसह लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात धनंजय भंडारे म्हणाले की, लायन्स झोनमध्ये डेंटल क्लिनिकचा सर्वात मोठा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. तसेच भविष्यात डिजिटल स्कूल व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने कार्य केले जाणार आहे. लायन्स डेंटल क्लिनिक उभारणीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता, हा प्रकल्प सर्व क्लब मधील सदस्यांच्या सहयोगातून उभा राहिला आहे.


सुधीर डागा म्हणाले की, लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या सामाजिक कार्याला सलाम राहणार असून, याप्रकारे कार्य करण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रात लायन्सची प्रतिमा उंचावण्याचे कार्य नेहमीच या क्लबने केले आहे. खर्चिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना परवडत नाही. तर दंत विकारावर कोणतीही पॉलिसी नसते. सर्वसामान्यांना परवडेल व चांगल्या प्रकारे उपचार मिळेल या उद्देशाने या क्लिनिकच्या माध्यमातून कार्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पैश्‍याच्या रुपाने अनेकजण मदत देत असतात, मात्र अमूल्य वेळ सहसा कोणी-कोणाला देत नाही. मात्र लायन्सचे सदस्य आर्थिक सहयोग देऊन देखील आपल्या जीवनातील अमूल्य वेळ गरजूंना आधार देण्यासाठी खर्च करत आहे. या कार्यातूनच लायन्स डिस्ट्रिक्ट मधला डेंटल क्लिनिकचा पहिला प्रकल्प उभा राहिला आहे. डिस्ट्रिकला अभिमान वाटावा अशा पध्दतीने क्लबचे कार्य सुरू असल्याचे गौरव उद्गार डागा यांनी काढले.


शरद मुनोत म्हणाले की, सामाजिक संवेदना जागृत ठेवून लायन्सच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. त्यांचे कार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणा ठरणार आहे. लायन्सच्या सेवाभावानेच अनेकांना आधार मिळाला असल्याचे सांगून, लंगर सेवेच्या कार्याचे देखील त्यांनी कौतुक केले. झोन चेअरपर्सन हरिष हरवानी या प्रकल्पाने शहर उपनगरातील नागरिकांना दंत विकारावर उत्तम सेवा मिळणार आहे. अल्पदरात सेवा असली तरी, तज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली हे क्लिनिक चालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत डॉ. मानसी असनानी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले. आभार संजय असनानी यांनी मानले.


लायन्स डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांना अशी मिळणार सेवा:
शहर व उपनगरातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांना अल्पदरात सेवा दिली जाणार आहे. दंत विकाराच्या आरोग्य सुविधा नाममात्र दरात मिळणार आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या दंत विकारावर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. डॉ. स्नेहा कांबळे व डॉ. सुदर्शन पारगावकर हे पूर्ण वेळ सेवा देणार आहेत. दातांच्या विकारावर अत्यंत खर्चिक असलेल्या रुट कॅनॉल, वेडेवाकडे दात सरळ करणे, कवळी बसवणे, स्माईल डिझायनिंग, इंप्लांट, पक्के दात बसविणे आदी सुविधा अल्पदरात उपल्ब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *