निशाणच्या मिरवणुकीने वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवारी (दि.8 सप्टेंबर) रात्री शहरातून निघालेल्या निशाणांच्या मिरवणुकीत वाल्मिक समाजबांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सर्जेपुरा येथील गोरक्षनाथ व गोगादेव मंदिराच्या जीर्णोद्धार करून मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेल्या मंदिरास फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी रात्री मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नंदीवर स्वार भगवान शंकरची मुर्ती असलेल्या मानाच्या निशाणने सर्वांचे लक्ष वेधले. तर मिरवणुकीतील डिजेच्या तालावर युवकांनी ठेका धरला होता.
