अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी व दूध संघाचे माजी सचिव नामदेव विठ्ठल काळे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते 80 वर्षाचे होते.
गावात त्यांचे सातत्याने सुरु असलेले सामाजिक कार्य, धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वांना सुपरिचित होते. ग्रामस्थ त्यांना गावात देवा म्हणून संबोधत असे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.