• Thu. Oct 16th, 2025

सैनिक बँक गैरकारभाराविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण

ByMirror

Aug 14, 2023

दोषींवर कारवाई करण्याची अन्याय निर्मूलन सेवा समिती व सैनिक बँक बचाव कृती समितीची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेत गेली सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई होण्याच्या मागणीसाठी अन्याय निर्मूलन सेवा समिती व सैनिक बँक बचाव कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि.14 ऑगस्ट) जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पप्पू कासोटे, बाळासाहेब धरम, वैभव पाचारणे, आकाश वाबळे, विकास झावरे, राहुल पवार, सुभाष वाळुंज, दिपक गुंजाळ, संतोष भांड, किशोर कदम, दिनेश गायखे, स्वाती पवळे, कुसुम पाचारणे, सुनंदा गावडे, पल्लवी जाधव सहभागी झाल्या आहेत.
पारनेर सैनिक बँकेत गेली सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी मोठ्या प्रमानात गैर व्यवहार केला आहे. अनेक प्रकरणात ते दोषी आढळले. परंतु संचालक मंडळावर व कर्मचाऱ्यांवर सहकार खात्याने अद्याप कुठलीही करवाई केलेली नाही. त्यामुळे त्वरित कारवाई करण्यासाठी उपोषणकर्ते आग्रही आहेत.


कर्जत शाखेत बोगस चेक वटवून 1 कोटी 79 लाख रुपयाचां अपहार करत शासकीय रक्कम हडप करणे, संचालक यांनी घेतलेले नातेवाईक कर्मचारी यांना सेवेतून कमी करणे, विना तारण कर्ज वाटप प्रकरणी जबाबदारी निश्‍चित करणे, रिजर्व्ह बँकेच्या नियमाचे उल्लंघन करत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जाहिरात देणे, क्रियाशील सभासद असताना अक्रियाशील नोटीसा पाठवून बँकेचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याबाबत उपोषण सुरु आहे.


या उपोषणाला सैनिक बँक बचाव कृती समितीचे बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी, संपत शिरसाठ मेजर, मारुती पोटघन, कॅप्टन विठ्ठल वराळ, शंकर नगरे, पुरुषोत्तम शहाणे, भरत हटावकर, सुरेश रासकर, अशोक गंधाक्ते आदी माजी सैनिक, सभासद, ठेवीदार यांनी पाठिंबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *