• Thu. Oct 16th, 2025

आर्मी पब्लिक स्कूल व आठरे पाटील स्कूलची अंतिम सामन्यात धडक

ByMirror

Aug 5, 2023

फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल स्पर्धा

अंतिम सामन्यांसाठी संघ सज्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.5 ऑगस्ट) 14 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल व आठरे पाटील स्कूलने विजय संपादन करुन अंतिम सामन्यात धडक मारली आहे.


शनिवारी सकाळी 14 वर्ष वयोगटातील उपांत्य फेरीतील फुटबॉल सामने रंगले होते. आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द ओएसिस स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 3-0 गोलने विजय मिळवला. सुरुवातीपासूनच आर्मी पब्लिक स्कूलने आक्रमक खेळी करुन एका मागोमाग गोल मारले. शेवट पर्यंत प्रतिस्पर्धी संघाला 0 गोलवर रोखून धरण्यात त्यांनी यश मिळवले.


तर आठरे पाटील विरुध्द सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट यांच्यात झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलने शेवट पर्यंत आपल्या उत्कृष्ट खेळाचा दबदबा कायम राखला. 7-0 गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी ठरला. स्पर्धेचे पंच म्हणून अभिषेक सोनवणे, सुयोग महागडे, अभय साळवे, प्रभू कुमार, राजेश चव्हाण, सुशील लोट काम पाहत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजीयन्स अकॅडमीचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, पल्लवी सैंदाणे, व्हिक्टर जोसेफ, जेव्हीअर स्वामी आदी परिश्रम घेत आहे.


  • या संघाचे रंगणार अंतिम सामने
    12 वर्ष वयोगटातील अंतिम सामना आठरे पाटील स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट संघात होणार आहे. तर तिसऱ्या स्थानासाठी आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द ओएसिस संघात होणार आहे.
    14 वर्ष वयोगटातील अंतिम सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील यांच्यात होणार आहे. तिसऱ्या स्थानासाठी सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट विरुध्द ओएसिस संघात होणार आहे.
    16 वर्ष वयोगटातील अंतिम सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील यांच्यात होणार आहे. तिसऱ्या स्थानासाठी तक्षीला विरुध्द श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल संघात होणार आहे.
    मुलींच्या संघातील अंतिम सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *