• Thu. Oct 16th, 2025

राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी व सहप्रसिद्धी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती

ByMirror

Jul 17, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी अहमदनगर येथील पत्रकार संदीप कुलकर्णी यांची तर सहप्रसिध्दी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी पदाधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीमध्ये ही घोषणा केली.


मराठी पत्रकार परिषदेचे सह प्रसिद्धीप्रमुख म्हणून कुलकर्णी पूर्वी काम पाहत होते. याकाळात त्यांनी मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियामध्ये सक्रिय करण्यासाठी तसेच परिषदेची संपर्क यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सक्षम करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांचा या कार्यांची नोंद घेत आता त्यांची राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. परिषदेतर्फे सोशल मीडियाद्वारे पत्रकार, प्रशासन आणि सरकार तसेच नागरिकांशी संपर्कात राहण्यासाठी यंत्रणा चालविण्यात येणार आहे. त्याची जबाबदारीही कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर, परिषदेचे पुणे येथील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांची सहप्रमुखपदी नियु्क्ती करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.


मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैदय यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *