तर दोन महिने कारावासाची शिक्षा
अहमदनगर (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्या प्रकरणी शहरातील एका डॉक्टरला दोन लाख रुपये दंड व दोन महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
सदर खटल्यात फिर्यादी हिरा केशवदास मोत्यानी यांनी डॉ. किशोर नरहरी पाथरकर (कायनेटिक चौक) यांना उधारीवर औषधे दिले होते. दिलेल्या औषधांच्या थकबाकी पोटी डॉ. पाथरकर यांनी मोत्यानी यांना दिलेला 1 लाख 39 हजार पाचशे रुपयाचा धनादेश वटला नाही. याबाबत मोत्यानी यांनी डॉ. पाथरकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती.
सदर खटल्यावर सुनावणी होवून नुकतेच अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी आय.एम. नायकवाडी यांनी आरोपी डॉ. किशोर नरहरी पाथरकर यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट 1981 चे कलम 138 अन्वये दोषी धरून 2 महिने कारावास तथा 2 लाख रुपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याबाबतचा आदेश दिला आहे. तसेच नुकसान भरपाई रकमेचा भरणा सात दिवसात न केल्यास सात दिवसाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅड. मनीष पी. गांधी यांनी कामकाज पाहिले.