• Fri. Mar 14th, 2025

रविवारी शहरात ताकद उद्योजकतेची या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

ByMirror

Jun 29, 2023

युवक-युवतींमधून उद्योजक घडविण्याचा बीइंग सोशलचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींमधून उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने शहरात बीइंग सोशल इंटरटेनमेंटच्या वतीने रविवारी (दि.2 जुलै) ताकद उद्योजकतेची या विषयावर निशुल्क व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिद्ध उद्योजक व्यवसायाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानाचा शहरातील युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन बीइंग सोशल इंटरटेनमेंटच्या वतीने करण्यात आले आहे.


सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार संग्राम जगताप व आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी वक्ते गणेश शिंदे व शरद तांदळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले ख्यातनाम उद्योजकांचे अनुभव जाणून घेता येणार आहे.


एकविसाव्या शतकातील व्यवसायासमोरील आव्हाने, डिजिटल युगात आपला व्यवसाय कसा वाढवावा? व्यवसायाचे मॅनेजमेंट कसे असावे? यासारख्या विविध प्रश्‍नावर चर्चा व त्यावर प्रश्‍नोत्तर कार्यक्रम रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *