• Fri. Sep 19th, 2025

चिमुकल्यांचे शाहू महाराजांना अभिवादन

ByMirror

Jun 26, 2023

शाहू महाराजांच्या वेशभुषेत आलेल्या विद्यार्थ्यांने वेधले लक्ष

प्रगती फाऊंडेशन व बटरफ्लाय नर्सरीचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रगती फाऊंडेशनच्या वतीने बालिकाश्रम रोड, महावीर नगर येथे बटरफ्लाय नर्सरीत राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चिमुकल्यांनी आपल्या पालकांसह शाहू महाराजांनी अभिवादन केले. तर शाहू महाराजांच्या वेशभुषेत आलेल्या विद्यार्थ्यांने सर्वांचे लक्ष वेधले.


या अभिवादन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शाहू महाराजांचे विचार व कार्यावर व्याख्यान देण्यात आले. यावेळी प्रगती फाऊंडेशनच्या अध्यक्षा अश्‍विनी वाघ, मंगला तवले, नयना भोसले, मनीषा पटेल, आरती कोरेकर, आरती कोरेकर, आरती लयशेट्टी, सुनिता सोनवणे, अनिल भिंगारदिवे, अजय नन्नवरे, सुहास पवार, मयूर भिंगारदिवे, विनायक आंधळे, निशा गोर्डे, दिपाली गायकवाड, शितल दळवी, उज्वला ढुमणे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.


अश्‍विनी वाघ म्हणाल्या की, राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या उध्दारासाठी कार्य केले. शिक्षणाची दूरदृष्टी ठेवून प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. वस्तीगृह संकल्पना अस्तित्वात आनली. परिवर्तनवादी चळवळीला शाहू महाराजांनी दिशा दिली. दूरदृष्टी असलेल्या राजाने बहुजन समाजातील प्रश्‍न सोडविण्याचे काम केले. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये शाहू महाराजांचे पुरोगामी विचार रुजविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजवीर ढुमणे या विद्यार्थ्याने शाहू महाराजांची वेशभुषा केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *