• Fri. Mar 14th, 2025

लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या झोन बैठकीत लायन्सच्या पदाधिकार्‍यांचा सन्मान

ByMirror

Jun 24, 2023

मल्टिपलमध्ये सर्वाधिक अवॉर्ड मिळविण्याचा रचला इतिहास

सामाजिक कार्याच्या लहरने लायन्स झोनने जागतिक पातळीवर ठसा उमटविला -राजेश कोथावडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्सच्या अहमदनगर झोन मधील क्लबने केलेले सामाजिक कार्याची इंटरनॅशनलने दखल घेतली. मल्टिपल मध्ये 35 पैकी 28 अवॉर्ड घेऊन नवा इतिहास रचला गेला आहे. साठ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. जगात टॉप टेन मध्ये आपला झोन आघाडीवर राहिला. सामाजिक कार्याच्या लहरने लायन्सच्या झोनने जागतिक पातळीवर ठसा उमटविला असल्याचे प्रतिपादन लायन्सचे प्रांतपाल राजेश कोथावडे यांनी केले.


शहरात लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3224 डी 2 झोनची बैठक पार पडली. या बैठकीत झोन मधील सर्व क्लबने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेताना अध्यक्षीय भाषणात प्रांतपाल कोथावडे बोलत होते. प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी रीजन चेअरमन सुनील साठे, झोन चेअरपर्सन आनंद बोरा, लायन्सचे अध्यक्ष सिमरनकौर वधवा, श्रीनिवास बोज्जा, हरीश हरवानी, अभिजीत भळगट, लिओच्या अध्यक्षा हरमनकौर वधवा आदींसह झोन मधील सर्व लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


पुढे कोथावडे म्हणाले की, लायन्सने राबविलेल्या कन्यादान व गरजू मुलींना सायकल वाटपाचा उपक्रमची इंटरनॅशनल कडून दखल घेण्यात आली. सर्वांनी झोकून योगदान दिल्यास यापेक्षा मोठा इतिहास रचला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रास्ताविकात आनंद बोरा यांनी वर्षभरात लायन्सची सामाजिक कार्याची लहर उसळली. या लहरीने अनेकांना आधार मिळाला. विविध सामाजिक उपक्रमाद्वारे गरजूंना मदतीचा हात देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वागत किरण भंडारी यांनी केले. ध्वजवंदन अनाया बोरा यांनी केले. यावेळी उपस्थित लायन्सच्या सर्व अध्यक्षांनी आपल्या क्लबच्या सामाजिक उपक्रमाचा वार्षिक अहवाल सादर केला.


लिओ क्लबच्या युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल लायन्सच्या पदाधिकार्‍यांना यावेळी गौरविण्यात आले. तर या झोनच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल झोन चेअरपर्सन आनंद बोरा यांना इंटरनॅशनलची पीन प्रदान करून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुनील साठे, विजय सारडा, प्रवीण गुलाटी, श्रेयस दीक्षित, आशिष बोरावके, सुनील जाधव, संतोष सोनावले, ज्ञानदेव बोंडे, सचिव प्रणिता भंडारी, सनी वधवा, प्रसाद मांढरे, महेश पाटील, अनया बोरा खजिनदार, प्रिया मूनोत, राजू गुरनानी, संदीप चव्हाण, मनयोगसिंह माखिजा, प्रिषा बजाज आदी उपस्थित होते.


बॉलीवुड थीमवर घेण्यात आलेला हा कार्यक्रम रंगला होता. यामध्ये लायन्सचे सदस्य सिने अभिनेते, अभिनेत्रीच्या वेषभूषेत सहभागी झाले होते. सर्वोत्कृष्ट वेशभूषा करणार्‍यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. तर सोडत पध्दतीने भाग्यवान विजेत्यांना विविध बक्षिस देण्यात आली.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिया बोरा, धनंजय भंडारे, नितीन मुनोत, पुरूषोत्तम झंवर, अरविंद पारगावकर, डॉ. संजय आसनानी, ऋषी सुकाले, दिलीप कुलकर्णी, प्रशांत मुनोत, किरण भंडारी यांनी परिश्रम घेतले. अहमदनगर शहरातील 5 क्लबचे सर्व ज्येष्ठ, युवक, महिला लायन आणि लिओ मेंबर यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय माळी यांनी केले. आभार हरजितसिंह वधवा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *