अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंगणगाव, हमीदपूर (ता. नगर) येथील प्रगतशील शेतकरी बाबा नाना कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते.
शहरातील बांधकाम व्यावसायिक नानासाहेब कांडेकर, संजय कांडेकर व अंबादास कांडेकर यांचे ते वडिल होत. धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.