पादुका दर्शनासाठी राहणार खुले
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूर (आंध्रप्रदेश) संस्थेच्या वतीने निघालेल्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या पालखी व रथयात्रेच शहरात बुधवारी (दि.21 जून) आगमन होणार आहे. तर गुरुवार पर्यंत पादुका दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी शहराती सर्व भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन श्री गुरुदेव दत्त पालखी स्वागत समिती व सर्व दत्त भक्तांच्या वतीने इंजि. केतन क्षीरसागर व अजित क्षीरसागर यांनी केले आहे.
बुधवारी सायंकाळी 6 वाजता गुलमोहर रोड, सावेडी येथील सावली सोसायटीच्या श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पालखी व रथयात्रेच आगमन होणार आहे. यावेळी पालखीचे भजन, आरतीने स्वागत केले जाणार आहे. तसेच महाअभिषेक व पादुका पूजन करुन भाविकांना पादुका दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्याला दत्त भक्तांना उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इंजि. केतन क्षीरसागर 8014105555 व अजित क्षीरसागर 9168226173 यांच्याशी संपर्क साधण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
