मानवसेवा हीच ईश्वरसेवा या शिकवणीचे प्रत्यक्ष दर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या 75 व्या अवतरण दिन सोहळ्यात समाजहिताचा आदर्श घालून देणारे भव्य रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला. केवळ धार्मिक विधींवर मर्यादित न राहता सेवाभावाच्या कार्यातून या सोहळ्याने समाजात संदेश देण्यात आला. सतलोक आश्रम, ढवळपुरी येथे तीन दिवस चाललेल्या या उत्सवात हजारो भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदानात सहभाग नोंदवला.
या रक्तदान शिबिरात महिला, तरुण, ज्येष्ठ भक्त अशा सर्वच वयोगटातील लोकांनी रक्तदान केले. वैद्यकीय तज्ञांच्या विशेष टीमने शिस्तबद्ध पद्धतीने तपासण्या करून रक्तदानाची प्रक्रिया पार पाडली. संपूर्ण वातावरण भक्तिभावासोबत सेवाभावानेही भारलेले होते. रक्तदान म्हणजे केवळ दान नव्हे, तर एखाद्याला नवे जीवनदान देण्याचा पवित्र उपक्रम असल्याची जाणीव या उपक्रमातून देण्यात आले.
संत रामपालजी महाराज नेहमी सांगतात की खरी भक्ती ही केवळ उपासनेत नसून मानवसेवा हाच खरा धर्म आहे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा! या शिकवणीला अनुसरूनच हे रक्तदान शिबिर पार पडले. एका थेंब रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, एखादे कुटुंब आनंदी राहू शकते, ही जाणीव भाविकांना करुन देण्यात आली.
अनेक तरुण भक्तांनी पहिल्यांदाच रक्तदान करून समाधानाचा अनुभव घेतला. समाजात रक्ताची टंचाई ही गंभीर समस्या असताना, सतलोक आश्रम ढवळपुरीतून घेतलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. या रक्तदान शिबिरामुळे भक्तांच्या मनात सेवाभावाची जाणीव निर्माण करुन देण्यात आली. संत रामपालजी महाराजांच्या शिकवणीमुळे भक्तांनी समजून घेतले की उपासना ही वैयक्तिक आनंदासाठी असते, तर सेवा ही संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी असते. म्हणूनच या रक्तदान शिबिरामुळे अवतरण दिन सोहळ्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते.