विद्यार्थ्यांनी योग, उत्तम आहार आणि चांगले विचार आत्मसात करुन यशाकडे वाटचाल करावी -आयुक्त यशवंत डांगे
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 750 मुलांनी एकाच वेळी केली योगासने केली.
अहिल्यानगरचे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी या कार्यक्रमात सहभागी होवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डांगे म्हणाले की, प्रत्येक भारतीयाने निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी योगचा स्वीकार करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी योगाबरोबरच उत्तम आहार आणि चांगले विचार आत्मसात करुन यशाकडे वाटचाल करावी. मोबाईलमध्ये तासनतास रिल्स व सोशल मीडियात गुंतण्यापेक्षा योग अभ्यास करुन शरीर संपदा कमविण्याचे त्यांनी आवाहन केले.
मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी संपूर्ण जगाने योगाचा स्विकार केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रत्येक शाळेत योगा अभ्यासचा समावेश करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
यावेळी आरोग्य भारतीचे कैलास चोथे, डॉ. अजित फुंदे, राजेश परदेशी, कुणाल अंतेपोलु, योग शिक्षक साजरी परदेशी यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह योग, प्राणायाम व ध्यानधारणेचे धडे दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक संभाजीराजे पवार, केडगाव भाजपा मंडळ अध्यक्ष भरत ठुबे, बंटी वीरकर, शाळेचे मुख्याध्याक संदिप भोर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, शिक्षक अविनाश साठे, शिवाजी मगर आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.