जय हिंद फाऊंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम
वृक्षारोपणातूनच खरी सेवा -भगवानराव दराडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील कोल्हुबाईचे कोल्हार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 75 झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प ताम्हण, पितोडिया वड, गौरी चौरी या झाडांचे रोपण करण्यात आले.
वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी समाजसेवक नेते भगवानराव दराडे, मेजर फुलचंद चेमटे, उद्योजक संजय माने, महादेव पालवे गुरुजी, गावचे सरपंच राजु नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, माजी सरपंच बाबाजी पालवे, कारभारी गर्जे, सदस्य ईश्वर पालवे, किशोर पालवे, वन विभागाचे राजू जावळे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, अशोक गर्जे, जालिंदर पालवे, बबन पालवे, विष्णू गिते, भाऊसाहेब पालवे, मिठू पालवे, सतीश साबळे, कैलास पालवे, रखमाजी पालवे, शंकर डमाळे, मोहन डमाळे, अशोक पालवे, अमोल गिते, देविदास नेटके, काकासाहेब बडे, आजिनाथ पालवे, शंकर बर्डे, रामा नेटके, सोमनाथ औटी, भाऊसाहेब पालवे, संदिप पालवे, रामभाऊ पालवे, चंदू नेटके आदी उपस्थित होते.
शिवाजी पालवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय व्यक्तीमत्व आहे. त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून होणे गरजेचे असून, त्यांच्या नावाने 75 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. लावलेले झाडांचे संवर्धन देखील फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते भगवानराव दराडे यांनी जय हिंद फाऊंडेशनच्या पर्यावरण संवर्धनासाठी सुरु असलेल्या कार्याची कौतुक केले. ते म्हणाले की, वृक्षारोपणातूनच खरी सामाजिक सेवा घडणार आहे. माजी सैनिक शिवाजी पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंदच्या माध्यमातून सातत्याने सुरु असलेले वृक्षारोपण व संवर्धन मोहिम पर्यावरण संवर्धनाची नांदी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार सुभेदार अशोक गर्जे यांनी मानले.
