• Sat. Mar 15th, 2025

हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे अनावरण

ByMirror

Jan 22, 2023

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहितीचा समावेश

युवकांनी चालवलेली सामाजिक चळवळ प्रेरणादायी -राधाकिसन देवढे

अहमदनगर (प्रतिनिधी)- सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य व इतर सामाजिक विषयांवर कार्यरत असलेल्या हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे अनावरण समाज कल्याणचे सहा. आयुक्त राधाकिसन देवढे यांच्या हस्ते करण्यात आले.

हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेत समाजकल्याण विभाग, बार्टी, आय.टी.आय.अहमदनगर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी सध्या परिस्थीवर शासकीय अधिकार्यांचे मार्गदर्शन, जनजागृतीचे लेख प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच बालमजुरी, वेठबिगार, पर्यावरण अशा सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली आहे.


या कार्यक्रमाप्रसंगी सहा.आयुक्त राधाकिसन देवढे,सहा.लेखाधिकारी राहुल गांगर्डे, निरीक्षक विनोद लाड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर,आदी उपस्थित होते तर या दिनदर्शिकेसाठी संजय घोगरे, राधाकिसन देवढे, अ‍ॅड. एस.आर. सय्यद,अमिना शेख, विक्रमजीत पडोळे, नितीन कवले, भास्कर झावरे, डॉ. प्रदीप पठारे, शामकांत शेडगे, खालिद जहागीरदार, हनीफ शेख, अ‍ॅड. शाहिस्ता सय्यद, डॉ. जालिंदर शेंडगे, सागर आमले, मुर्तुजा आबेदिन, डॉ. प्रकाश गरुड, जावेद शेख, डॉ.पी.बि. कर्डिले, मनोज बोज्जा, राजेंद्र पाचे, राजेंद्र उदागे, दत्ता जाधव, डॉ.एम.के. शेख, सुनील काळे, विशाल धात्रक, डॉ. जालिंदर शेंडगे, इरफान जहागीरदार, दिलावर सय्यद, भगवान गोरखे, डॉ.करिष्मा सुराणा, डॉ. चेतना बहुरूपी, सुभाष सोनावणे, पप्पू इनामदार, श्रुती साखरे, मंदाकिनी क्षीरसागर, एजाज पिरजादे, केतन चीलखा, राजू तांबोळी आदींचे सहकार्य लाभले.


समाज कल्याणचे सहा. आयुक्त राधाकिसन देवढे म्हणाले की, युवकांना दिशा देण्याचे कार्य हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशन करत आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांनी चालवलेली सामाजिक चळवळ प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांनी मागील अनेक वर्षांपासून सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, इतर सामाजिक क्षेत्रात हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशन कार्यरत आहे. युवक-युवतींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. चित्रपट व फॅशन इंडस्ट्रीमध्ये युवकांना संधी देण्यासाठी फाऊंडेशन प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *