अहमदनगर (प्रतिनिधी)- तामसवाडी (ता. नेवासा) येथील हाजी साहेबखान सरदारखान पठाण यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले. 92 वर्षीय साहेबखान धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे होते. पवित्र रमजान महिन्यात त्यांचे निधन झाले असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक लालखॉ पठाण यांचे ते वडील तर कुकाणा येथील सुविधा हॉस्पिटलचे डॉ. सुजाअत पठाण यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.