अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या मोची गल्लीतील बांगड्यांचे प्रसिद्ध व्यावसायिक हाजी मोहम्मद कासमभाई चुडीवाले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. त्यांचा दफनविधी जलालशाह कब्रस्तान मध्ये करण्यात आला.
मनमिळावू स्वभाव व सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने ते सर्वांना सुपरीचीत होते. त्यांच्या पश्चात चार भाऊ, भाऊजया, तीन मुले, चार मुली, एक बहीण, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
हाजी कासमभाई चुडीवाले यांचे निधन
