योग-प्राणायामाने निरोगी जीवनाचा कानमंत्र, तर पर्यावरण संवर्धनासाठी राबविले वृक्षरोपण
ग्रुपच्या सदस्यांना मिठाई व फराळचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणार्या हरदिन मॉर्निंग ग्रुपने दिवाळीची आरोग्यदायी पहाट साजरी केली. दररोज योग-प्राणायामाने दिवसाची सुरुवात करणार्या हरदिनच्या सदस्यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी करुन घेऊन योगाचे धडे दिले. तर वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. सदस्यांना मिठाई व फराळचे वाटप करुन जीवन आरोग्यमयी करण्याचे आवाहन केले.

भिंगार मधील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कमध्ये दिवाळीची आरोग्यदायी पहाटची सुरुवात योग-प्राणायामाने झाली. यानंतर श्रमदान करुन परिसराची स्वच्छता करण्यात आली. तर वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, योगशिक्षक प्रकाश देवळालीकर, सीए रवींद्र कटारिया, रमेश वराडे, दीपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, सुभाष नाबरिया, सुभाष गोंधळे, दिलीप गुगळे, विकास भिंगारदिवे, अभिजीत सपकाळ, विश्वास वाघस्कर, सरदारसिंग परदेशी, दीपक घोडके, दिलीप बोंदर्डे, अविनाश जाधव, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, सुमेश केदारे, बापूसाहेब तांबे, प्रभाकर ठोंबरे, विठ्ठल राहिंज, अजय खंडागळे, विकास निमसे, बाबासाहेब बेरड, रावसाहेब कोकणे, जालिंदर अळकुटे, शेषराव पालवे, देविदास गंडाळ, अनंत सदलापूर, राजू शेख, विशाल भामरे, भाऊसाहेब कराळे, बबनराव चिंचिणे, विलास तोतरे, रमेश त्रिमुखे, अजेश पुरी, तुषार घाडगे, अमोल सपकाळ, सुहास देवराईकर, सदाशिव मांढरे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, दिवाळी हा अंधकार दूर करुन जीवनात प्रकाश निर्माण करणारा सण आहे. या सणानिमित्ताने आरोग्य संवर्धन करण्याचा प्रत्येकाने संकल्प करण्याची गरज आहे. प्रत्येकाचे जीवन आरोग्यमयी होण्यासाठी योग-प्राणायामाच्या माध्यमातून तर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाद्वारे हरदिन मॉर्निंग ग्रुप योगदान देत आहे. या चळवळीत सर्वसामान्यांना सहभागी करुन घेण्यासाठी दिवाळीची आरोग्यदायी पहाट उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रुपच्या सदस्या सुनिता रमेश वराडे यांना दसर्याच्या खरेदीवर सोडत पध्दतीने सोन्याचे नाणे तसेच माझी महालक्ष्मी सजावट स्पर्धेत जयश्री दिपक बडदे यांना देखील सोन्याचे नाणे बक्षिस मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.