पहाटे ग्रुपच्या मित्रांना भेटून गेलेले शेख यांची दुपारी धडकली मृत्यूची बातमी
सामाजिक चळवळीतला जोडीदार गमावला -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य अब्बास अब्दुल हमीद शेख उर्फ पप्पू भाई यांचा अपघाती निधन झाला असता, त्यांना भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क मध्ये सर्व ग्रुपच्या सदस्यांनी श्रध्दांजली वाहिली.
अब्बास शेख यांनी पहाटे जॉगिंग पार्क मध्ये ग्रुपच्या सदस्यांसह वेळ घालवून व्यायाम केले. कामानिमित्त सकाळी ते नेवासा येथे गेले. दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास नेवासा बाजार समिती येथे त्यांच्या मोटार सायकलला मालट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ग्रुपच्या सदस्यांना भेटून गेलेल्या अब्बासची मृत्यूची बातमी कळताच सर्वांना धक्का बसल्याचे रमेश वराडे यांनी सांगितले.

ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, धर्म-जातीच्या पलीकडे जाऊन अब्बास शेख हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या परिवाराशी जोडले गेले. त्यांचा सामाजिक उपक्रमात नेहमीच सक्रीय सहभाग राहिला. सकाळी भेटलेल्या मित्राचे दुपारी दुर्देवी मृत्यू झाल्याचा सर्वांना मोठा मानसिक धक्का बसला. अत्यंत मनमिळाऊ सामाजिक चळवळीतला जोडीदार गमावल्याचा दु:ख होत असल्याचे त्यांनी सांगितले. या श्रध्दांजली सभेत पिंटूशेठ बोरा, रमेश त्रिमुखे, सचिन चोपडा, संजय भिंगारदिवे, विकास भिंगारदिवे, जालिंदर बोरुडे यांनी आपल्या भाषणात शेख यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी दीपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, सुभाष गोंधळे, अशोक पराते, सर्वेश सपकाळ, मनोहर दरवडे, दिलीप गुगळे, सुमेश केदारे, अशोक लोंढे, मुन्ना वाघस्कर, अभिजीत सपकाळ, संतोष लुनिया, रमेश कोठारी, विनोद खोत, जयकुमार मुनोत, प्रफुल्ल मुळे, सचिन चेमटे, दिनेश शहापूरकर, नामदेवराव जावळे, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, दीपक शिंदे, विलास तोतरे, संतोष हजारे, किशोर भगवाने, सरदारसिंग परदेशी, राजू शेख, बापू तांबे, अविनाश जाधव, अजय खंडागळे, विकास निमसे, जालिंदर बेल्हेकर, अशोक भगवाने, अविनाश पोतदार, राजेंद्र झोडगे, संतोष रासकर, कुमार धतुरे, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, केशवराव दवणे, राहुल दिवटे, गणेश सातकर, महेश सरोदे, सदाशिव नागापुरे, योगेश चौधरी, भाऊसाहेब गुंजाळ, जालिंदर बेरड, किरण फुलारी, सुनील जाधव आदी उपस्थित होते.