मुक बधीर विद्यालय व वसतीगृहाला ई लर्निंगसाठी दोन एलईडी टिव्ही भेट
सांताक्लॉजच्या रुपात अवतरलेल्या महिला सदस्यांची मुलांसह धमाल
अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित व गरजू घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी सामाजिक योगदान देणार्या सेवाप्रितच्या महिला सदस्यांनी मुक-बधीर विद्यार्थ्यांसह ख्रिसमस सण व येणार्या नवीन वर्षाचा आनंद लुटला.
सेवाप्रितच्या सदस्या शाळेत सांताक्लॉजच्या रुपात अवतरुन विद्यार्थ्यांच्या ई लर्निंगसाठी दोन एलईडी टिव्ही, चॉकलेट, केक व अल्पोपहाराचे वाटप केले. विद्यार्थ्यांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद लुटीत विद्यार्थ्यांनी धमाल केली.

सावेडी येथील मुक बधीर विद्यालय व वसतीगृहात हा नवीन वर्षाच्या प्रारंभी सोहळा रंगला होता. सांताक्लॉजचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. तर संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांसह उपस्थित महिला सदस्या थिरकल्या. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाने मुक-बधीर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हास्य फुलले होते. कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

या कार्यक्रमासाठी सेवाप्रितच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, ग्रुप लिडर रितू वधवा, अर्चना खंडेलवाल, लता राजोरिया, वंदना गोसवी, कल्पना श्रॉफ, कविता दरंदले, लविशा माखिजा, मंगला झंवर, मीरा बारस्कर, प्रिती धुप्पड, राजश्री पोहेकर, संगिता चव्हाण, संगिता खरमाळे, शिल्पा सबलोक, श्वेता गांधी, सुमन कपूर, सुनिता बक्षी, सुरेखा बारस्कर, स्वाती ठाकुर, वंदना ठुबे, विजया सारडा आदी सदस्या उपस्थित होत्या.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, मुक-बधीर विद्यार्थी समाजातील एक घटक असून, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. शिक्षणाने ही मुले चांगले नागरिक म्हणून घडणार आहे. त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ई लर्निंगसाठी एलईडी भेट देण्यात आले आहे. स्वत:ला कमी न लेखता मनातील न्यूनगंड दूर करावा. परमेश्वराने काही कमी दिले असले तरी, तो काही विशेष गुण देत असतो.

विद्यार्थ्यांनी स्वत:मधील गुण ओळखून त्या दिशेने जीवनाची वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले. सेवाप्रितच्या महिला सदस्यांनी देखील मुलांशी संवाद साधून त्यांच्यासह विविध खेळाच्या माध्यमातून त्यांचा आनंद द्विगुणीत केला.
