• Sat. Mar 15th, 2025

सामाजिक कार्यकर्ते भिंगारदिवे यांचे तहसिलदार विरोधात उपोषण

ByMirror

Mar 9, 2023

अतिक्रमण हटविण्यासाठी पैसे देऊनही आनखी पैश्याची मागणी केल्याचा आरोप

उपोषणाचा दुसरा दिवस

अहमदनगर (प्रतिनिधी)- ब्रह्म तलाव आलमगीर नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण हटविण्यासाठी टाळाटाळ करुन आनखी आर्थिक मागणी तहसिलदारांनी केली असल्याचा आरोप करुन सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी आर्थिक व मानसिक फसवणुक केल्याप्रकरणी तहसिल कार्यालया समोर बुधवारी तहसिलदार विरोधात उपोषण केले. गुरुवारी (दि.9 मार्च) दुसर्‍या दिवशीही उपोषण सुरु होते. सदरचे अतिक्रमण हटवून न्याय मिळण्याची मागणी भिंगारदिवे यांनी केली आहे.


ब्रह्म तलाव आलमगीर नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील मोजे भिंगार सर्वे नंबर 209/2 पैकी प्लॉट नंबर 13 ते 39 हे क्षेत्र विकसित करण्याकरिता पवन भिंगारदिवे यांनी अब्दुल शेख यांच्याकडून घेतले आहे. सदर क्षेत्रावर काही भटक्या जातीच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अतिक्रमण केले आहे. सदर जागेचे मोजणी व सफाईसाठी गेले असता, त्या गुंडांनी भिंगारदिवे यांना पैश्याची मागणी केली. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्यासाठी धमकाविले. सदर प्रकरण पोलीस स्टेशनला कळविले असता, त्यांनी महसूल विभागात अतिक्रमण विभागाची परवानगी आणण्याचे स्पष्ट केले. त्यावर अतिक्रमण काढण्यासाठी महसुल विभागाकडे अर्ज करण्यात आला होता. तहसीलदार यांनी भिंगार कॅम्प यांना चौकशी करून पोलीस बंदोबस्त देण्याचे आदेश दिले असता, पोलीस प्रशासनाने बंदोबस्त देतावेळी महसूल विभागाचे कोण अधिकारी उपस्थित राहणार? असल्याचे पत्राने कळविले.

यावर कारवाई होत नसल्याने भिंगारदिवे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. 27 डिसेंबर रोजी तहसिलदार यांनी मंडळ अधिकारी यांना सदर ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश दिले, तरी मंडळ अधिकारी, भिंगार तलाठी व कोतवाल यांनी सदर ठिकाणचा पंचनामा करून तहसीलदार यांना सदर केला असता तहसीलदार यांनी बोलावणी केली, त्यांना भेटण्यास गेले असता त्यांनी आनखी पुढील पत्रासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली असल्याचे उपोषणकर्त्यांने निवेदनात म्हंटले आहे. पहिले पैसे देऊन देखील आनखी पैश्याची मागणी केली जात असताना, यामध्ये आर्थिक व मानसिक फसवणुक झाली असल्याचा आरोप करुन भिंगारदिवे यांनी उपोषण सुरु केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *