चमकदार कामगिरी करत 7 पदके पटकाविली
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे मॉडर्न पेटाथलॉन फेडरेशन ऑफ इंडिया, मॉडर्न पेटाथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व अहमदनगर जिल्हा मॉडर्न पेटाथलॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहावी मॉडर्न पेंटाथलोन लेझर रन राष्ट्रीय स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये शहरातील ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत 7 पदके पटकाविली.
मॉडर्न पेंटाथलोन लेझर रन राष्ट्रीय स्पर्धेत विविध राज्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत आनंद काळे प्रथम क्रमांक, अनिकेत कोळगे, साक्षी मोरे द्वितीय क्रमांक, तर शौर्य शेळके, गौतमी विधाटे, ओम पवार, सुयोग शेळके यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन तृतीय क्रमांक मिळवले.
या खेळाडूंना मार्गदर्शक दिनेश भालेराव व सहाय्यक मार्गदर्शक गुलजार शेख व अमित चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. पदक पटकाविलेल्या खेळाडूंचे ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशन अध्यक्ष अतिक शेख, क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले , सुनील जाधव सर शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त, उपाध्यक्ष शफीक शेख, संदीप घावटे, महेंद्र हिंगे, सुयोग शेळके, अतुल साठे, प्रशांत जगधने , संतोष हराळ व ट्रॅक रेसर्स स्पोर्टसचे पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.