• Thu. Jan 29th, 2026

सर्व रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

ByMirror

Feb 17, 2023

अलतमश जरीवाला मित्र मंडळ व इव्हनजलीन बुथ हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम

निरोगी समाजासाठी युवकांनी आरोग्य चळवळ उभी करावी -मा.आ. डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज निरोगी करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन आरोग्य चळवळ उभी करावी. समाजात आरोग्याचे प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. युवकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत असून, महिलांच्या आरोग्याच्या समस्या देखील झपाट्याने वाढत आहे. याला व्यायामाचा अभाव व चुकीच्या आहारात पद्धती कारणीभूत असून, याबाबत आरोग्याची चळवळीतून समाज जागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.


धरती चौक येथील बागवान जमातखाना मध्ये घेण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. तांबे बोलत होते. अलतमश जरीवाला मित्र मंडळ व इव्हनजलीन बुथ हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हा पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी रफीक मुन्शी, सलीम जरीवाला, काँग्रेसचे नेते ज्ञानदेव वाफारे, बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


प्रास्ताविकात अलतमश जरीवाला म्हणाले की, शिबिराच्या माध्यमातून वेळोवेळी आरोग्य तपासण्या करुन गंभीर आजाराला तोंड देता येते. आरोग्याबाबत जागृक न राहिल्यास मोठ्या कठिण परिस्थितीतून जावे लागते. सर्वसामान्यांना इच्छा असताना देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने आरोग्य तपासणी करण्यास अडचण येते. यासाठी या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना संपूर्ण आरोग्य तपासणीची संधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनी महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर काळाची गरज बनले असल्याचे सांगितले. नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले की, तणावपूर्ण जीवनशैलीने सर्वांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नियमित आरोग्य तपासणी गरजेची गोष्ट बनली आहे. आरोग्य ही मनुष्याची खरी संपत्ती आहे. त्याची काळजी घेतल्यास जीवनाचा खरा आनंद घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमासाठी फैय्याज शेख, सादिक बागवान, अ‍ॅड. अशरफ शेख, समीर बेग, फिरोज शेख, आवेज जहागीरदार, समीर शेख, मुदस्सर जहागीरदार, रेहान जरीवाला, फैय्याज तांबोली, समीर सय्यद, शरीफ बागवान, रहीम शेख, फरहान खान, फैजान मिर्झा, मुन्तजिर खान, अजहर शेख, आवेज शेख, दानिश हुंडेकरी, शकील शेख, रिजवान जरीवाला, अफरोज सय्यद, मुसद्दीक मेमन, मोईन कुरेशी, शादाब शेख, समीर मुन्शी, शहेबाज कुरेशी, अरबाज बागवान, फजल कराचीवाला, नदीम बागवान, मतीन शेख, अज्जू शेख, शरीफ सय्यद, आबिद शेख, अमित पठारे, जॉन वेनन, प्रवीण साबळे, विक्की पगारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *