• Wed. Mar 12th, 2025

सरकारने लोकशाहीच्या नावाने तानाशाही तर निवडणूक आयोगाने निवडणुकांचा तमाशा केला

ByMirror

Mar 4, 2023

इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन जनआंदोलनाचा आरोप

जातनिहाय जनगणना व ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान होण्यासाठी जेलभरोचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने लोकशाहीच्या नावाने तानाशाही तर निवडणूक आयोगाने निवडणुकांचा तमाशा केला असल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन जनआंदोलनाच्या वतीने करण्यात आला आहे. तर देशात जातनिहाय जनगणना व ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान होण्यासाठी जन आंदोलन उभारुन जेलभरो करण्याचा इशारा जालिंदर चोभे मास्तर यांनी दिला आहे.

जालिंदर चोभे मास्तर


राजकीय विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएम हटाव व जातनिहाय जनगणना करण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतल्यास सत्ताधारी आणीबाणीची घोषणा करतील. मोदी सरकारच्या कार्यकाळात केवळ हिंदुत्वाचा गाजावाजा केला पण हिंदूसाठी त्यांनी काही केले नसल्याचा आरोप चोभे यांनी केला आहे.हिंदुत्वाच्यानादी लावून मुसलमानाविषयी द्वेष वाढवून हिंदू जनतेला गुलाम, गरीब, कंगाल, करतील मुसलमानाचे नाव आणि हिंदूवर घाव घातला जात असल्याचे चोभे यांनी म्हंटले आहे.
ओबीसी, साळी, कोळी, माळी, मराठी आणि वंजारी समाजाने सावध होऊन ईव्हीएम विरोधी भूमिका घ्यावी अन्यथा 2024 चे संसदेच्या निवडणुकमध्ये मोदी पुन्हा सत्ताधारी ईव्हीएममुळे होतील. तर लोकशाहीचा राज्यघटनेचा अंत होण्याचा धोका त्यांनी वर्तविला.


देशाची आर्थिक स्थिती लॉकडाऊन, नोटाबंदी, जी.एस.टी.मुळे रसातळाला म्हणजे नेपाळ पेक्षाही खालवली आहे. बेरोजगारी, उपासमारी, शिक्षण आरोग्य व्यवस्थेचे वाटोळे केले. त्यापेक्षाही पनामा पेपर मामला, पोगॅसेस घोटाळा, हिंडेन बर्ग रिपोर्ट, बीबीसी डॉक्युमेंटरीमुळे सत्ताधार्‍यांच्या प्रगतीचा फुगा फुटला आणि अनेक गुंतवणूकदारासह एलआयसी एसबीआय सारख्या वित्तीय संस्था बँकांचे दिवाळे निघण्याची वेळ आलेली आहे. त्यातच इस्राईली कंपनीने 30 देशातील इलेक्शन मशीन कसे हॅक केले? याचेही स्पष्टीकरण आले असताना, भारतीय राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्याचे तारे तोडून ताशे बढवीत आहेत. जिथे जिथे व्हीव्हीपॅट लावले होते तेथे ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे मॅचिंग न करता निकाल घोषित केले असे अनेक गैरप्रकार सर्वांना माहीत असताना निवडणूक आयोगाने निवडणुकांचा तमाशा केला असतांना सर्व विरोधक, समाजसेवक, विचारवंतांनी एकत्रितपणे रस्त्यावर लढाईसाठी सज्ज होऊन जेलभरो करण्यासाठी निवडणूक आयोगाला घेराव करून निवडणूक आयोगाची आणि ईव्हीएमची हकालपट्टी केली तर 2024 च्या निवडणुकांमध्ये लोकशाही वाचणार असल्याचे चोभे यांनी प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट केले आहे.

तर बिहार राज्याप्रमाणे, उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव प्रमाणे जातीगत जनगणना करण्यासाठी आग्रही भूमिका घेऊन सर्वांनी एकत्रित लढा दिला तरच सरकारला हादरे बसतील व जातनिहाय जनगणना होणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *