• Sat. Sep 20th, 2025

संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या आझाद मैदानातील धरणे आंदोलनास पाठिंबा

ByMirror

Mar 2, 2023

अकरावा दिवस उलटून देखील दखल घेतली जात नसल्याने आंदोलक संतप्त

शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचचे पदाधिकारींचा सक्रीय सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट फेलोशीप मंजूर करावे व अवार्ड लेटर देण्याच्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदान बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देऊन सक्रीय सहभाग नोंदविण्यात आला.


या आंदोलनात शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष सुनिल सकट सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते अशोक बाविस्कर व रिपब्लिकन (खोरिपा) पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाठिंब्याचे पत्र आंदोलकांना देण्यात आले. आंदोलनाचा अकरावा दिवस उलटून देखील दखल घेतली जात नसल्याने आंदोलकांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त करुन प्रशासनाचा निषेध नोंदविला.


बार्टीच्या वतीने देण्यात येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत सर्व पात्र 861 विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट फेलोशीप मंजुर करावी व त्यांना तात्काळ अवार्ड लेटर देण्याच्या प्रमुख मागणीसाठी मुंबई आझाद मैदान येथे संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सिद्धधन मोरे, ईश्‍वर अडसूळ, किशोर तुपविहीरे, भीमराव मोटे, प्रदीप त्रिभुवन, सतीश सूर्यवंशी, मनीषा इंगळे, अर्चना वानखेडे, नितीन वानखेडे, अंजली कोकणे आदी संशोधक विद्यार्थी सहभागी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *