• Thu. Mar 13th, 2025

संदीप कुलकर्णी यांची मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य सहप्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती

ByMirror

Apr 8, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेचे नगर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी यांची राज्य सहप्रसिध्दी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी परिषदेच्या कर्जत येथे झालेल्या बैठकीत ही घोषणा केली.

संदीप कुलकर्णी


नगर जिल्हयाचे प्रसिध्दी प्रमुख म्हणून संदीप कुलकर्णी यांनी चांगले काम केले आहे. परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व तालुका अध्यक्ष मेळावा यशस्वी करण्यासाठीही त्यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांच्या या कार्याची नोंद घेत त्यांची राज्य सहप्रसिध्दी प्रमुख म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

राज्य प्रसिध्दीप्रमुख अनिल महाजन यांच्या समवेत कुलकर्णी काम करतील, असेही पाबळे यांनी सांगितले. मुख्य विश्‍वस्त एस.एम देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैदय यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *