गुरुवारी निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या हस्ते होणार पुरस्काराने सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार 2023 राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवकचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब केदारे यांना नुकताच जाहीर करण्यात आला. सदर पुरस्काराची घोषणा संस्थेचे अध्यक्ष भारत कांबळे यांनी नुकतीच केली.
बाळासाहेब केदारे मागील तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून चर्मकार समाजाला संघटित करण्याचे काम ते सातत्याने करत आहे. महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी व राष्ट्रीय सण, उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देऊन समाजातील गरजूंना आधार देण्याचे काम करत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता आदी समाजोपयोगी कार्य सातत्याने सुरु आहे.
या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला असल्याचे भारत कांबळे यांनी सांगितले. गुरुवार दि. 2 मार्च रोजी प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या हस्ते आडगाव (ता. पाथर्डी) येथे होणार्या कार्यक्रमात केदारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते, चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे, राजेंद्र बुंदेले, संतोष उदमले, कैलास गांगर्डे, प्रकाश पोटे, ज्ञानेश्वर म्हैसमाले, मिराताई शिंदे, शोभाताई कानडे, मीनाताई गायकवाड, पोपटराव बोरुडे, अश्रू लोकरे, बाबासाहेब लोहकरे, प्रवीण केदारे आदींसह वडघुल (ता. श्रीगोंदा) गावचे सरपंच, सदस्य, व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.