अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या सेवक संचालकपदी तुकाराम सांगळे व वाघोबा शेलार यांची नियुक्ती करण्यात आली.
अहमदनगर डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉइज युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी नवनिर्वाचित सेवक संचालक सांगळे व शेलार यांच्या नियुक्तीचे पत्र बँक व्यवस्थापनास सादर केले.
सांगळे व शेलार हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून बँकेच्या सेवेत आहेत. त्यांच्या नियुक्तीने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच त्यांच्या नियुक्तीचे युनियनचे जॉईंट सेक्रेटरी नितीन भंडारी, खजिनदार मुरलीधर कुलकर्णी यांनी स्वागत केले असून, युनियनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सांगळे व शेलार यांचे अभिनदन केले आहे.
