अहमदनगर (प्रतिनिधी)- रामजी अण्णा मित्र मंडळ, प्रवीण भाऊ भारस्कर मित्र मंडळ, वस्ताद ग्रुप, भारस्कर वाडी मित्र मंडळ व शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांचा नागरी सत्कार करण्यात आला.
प्रवीण भारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली व काका नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी अरुण पाटील लांडे, ताहेर पटेल, संजय फडके, विजयराव देशमुख, संजय कोळगे, राहुल देशमुख आदी उपस्थित होते.
संजय कोळगे यांनी मतदारांचे आभार व्यक्त करुन घुले बंधूंनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगितले. ताहेर पटेल म्हणाले की, सर्व समावेशक भूमिका व सर्व सामान्य घटकांना बरोबर घेऊन काम केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
काका नरवडे यांनी हा विजय सर्वसामान्य शेतकर्यांचा आहे. बाजार समिती शेतकर्यांची संस्था असून, शेतकर्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी संजयकोळगे, राजाभाऊ दौंड, प्रदीप काळे, जाकिर कुरेशी, जमीर पटेल, मनोज तिवारी, संतोष बेरड यांनी भावना व्यक्त करुन शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देऊन कार्य केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
प्रास्ताविकात प्रवीण भारस्कर यांनी शेतकर्यांचा विकास साधण्यासाठी बाजार समितीची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. यासाठी सर्व उमेदवार शेतकरी हिताचे निर्णय घेऊन कार्य करणार असल्याची अपेक्षा व्यक्त करुन सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत केले.
यावेळी वाहब शेख, संतोष जाधव, समीर शेख, सचिन आदमाने, तुषार लांडे, तुफेल मुल्लानी, अश्फाक पठाण, अब्दुल बारी, इमरान मन्यार, विश्वास मोहिते, प्रदीप मोहिते, राहुल भारस्कर, गणेश ससाणे, पोपट भारस्कर, एकनाथ कसबे, रणजित मोहिते, विकी म्हस्के, रावसाहेब भारस्कर, उत्तम भारस्कर, बाळासाहेब भारस्कर, सचिन भारस्कर, संदीप शिरसाठ, अभी बनकर, यश भारस्कर, स्वप्निल मोहिते, प्रदीप ससाणे, रोहित प्रव्हाने, एकनाथ कसबे, राजू वाघमारे, रणजित मोहिते, अमोल देशमुख, विकी म्हस्के, राहुल भारस्कर, प्रदीप प्रव्हाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच विष्णुपंत घनवट पाटील यांनी केले. आभार राहुल देशमुख यांनी मानले.