घर घर लंगरसेवेच्या सामाजिक कार्याचे राज्यपालाकडून कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शीख, पंजाबी व सिंधी आणि घर घर लंगरसेवेच्या वतीने केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शीख, पंजाबी समाजाचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, सिंधी समाजाचे अध्यक्ष महेश मध्यान आदी उपस्थित होते.

केरळचे राज्यपाल खान नुकतेच पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेत मार्गदर्शन करण्यासाठी शहरात आले होते. यावेळी त्यांचा सत्कार करुन कोरोना काळात घर घर सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य गरजू घटकांना करण्यात आलेल्या मदतीची माहिती त्यांना देण्यात आली. लंगर सेवेने मानवसेवेच्या भावनेने केलेल्या कार्याचे खान यांनी कौतुक केले.
