• Thu. Oct 16th, 2025

शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचा केडगावमध्ये निषेध

ByMirror

Aug 8, 2023

महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून धडा शिकवण्याची गरज -उमेश कोतकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या त्या युवकाचा केडगाव वेस समोर संदीप (दादा) कोतकर मित्र मंडळ व केडगाव ग्रामस्थांच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.


प्रारंभी केडगाव वेस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचा निषेध नोंदवून त्या युवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश कोतकर, अजित कोतकर, भूषण गुंड, बापू सातपुते, सचिन सरोदे, किशोर कोतकर, सागर पालवे, केतन भंडारी, ज्ञानेश्‍वर चौधरी, सुरज कोतकर, अभी चोभे, अभी गावडे, अभिषेक शिंदे, सागर शिंदे, आदित्य देशमुख, करण गौड, ऋषिकेश कोतकर, सनी थोरात, ओम शेलार, अजिंक्य कोतकर, शकील शेख आदींसह युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शहरातील एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक व आक्षेपार्ह संभाषण केल्याने सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून धडा शिकवण्याची गरज असल्याचे उमेश कोतकर यांनी भावना व्यक्त केली. शासनाने देखील अशा घटना गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर देशद्रोहसारखे गुन्हे दाखल केल्यास अशा घटना पुन्हा घडणार नसल्याचे अजित कोतकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *