टायगर इलेव्हन पटकाविला हिंदवी चषक
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी चषक 2 क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर रंगलेल्या स्पर्धेला शहरातील संघांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
शिवजयंती दिनी शुक्रवारी (दि.10 मार्च) टायगर इलेव्हन विरुध्द राजिल (जिओ) इलेव्हन संघात अंतिमा सामना पार पडला. यामध्ये टायगर इलेव्हन संघाने 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. स्पर्धेच्या बक्षिस वितरणासाठी जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ गाडळकर, नचिकेत रसाळ, नंदू वाघ, अमित टेकवणी, विशाल भालेराव, संभाजी राशींकर, नितीन मुनोत, प्रमोद घोडके आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायाधीश सुनील गोसावी म्हणाले की, आरोग्यमय जीवनासाठी मैदानी खेळाशिवाय पर्याय नाही. आरोग्य सदृढ असल्यास जीवन आनंदी बनते. मैदानी खेळाने मन प्रसन्न होऊन तणाव कमी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दत्ताभाऊ गाडळकर यांनी युवकांनी मैदानी खेळाकडे वळण्याची गरज आहे. खेळाने युवकांमध्ये खेळाडूवृत्ती निर्माण होत असते. तर खेळाडूवृत्ती अंगिकारल्यास कोणत्याही कठिण प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजयी ठरलेल्या टायगर इलेव्हन संघास हिंदवी चषक प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी उत्कृष्ट खेळाडूंना बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी नचिकेत रसाळ (दिशा इंजीनियरिंग कंपनी), राजू घुले (फार्मा स्पोर्टस), किशोर ढवळे (गुड गिफ्टस) यांचे सहकार्य लाभले. ही ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मयूर देऊळगावकर, अजय जाधव, दीपक आवारे, सचिन राहिंज, अभिजित गवळी, अमोल खाकाळ, प्रवीण सरोदे, सिद्धार्थ वाघमारे, राहुल थोरवे, संकेत देशमुख, वैभव वाघ यांचे सहकार्य लाभले.