• Fri. Jan 30th, 2026

शिवजयंतीनिमित्त गुलमोहर रोडला रंगणार शिवकालीन वेशभूषा स्पर्धा

ByMirror

Feb 16, 2023

तर चित्रकला स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेत सहभागी होण्याचे शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चित्रकला व शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या स्पर्धेत शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी केले आहे.


चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील प्रसंग हा विषय देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी घरीच चित्र काढून व रंगवून रविवारी (दि.19 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता गुलमोहर रोड येथील आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालयात जमा करावयाचे आहे. चित्रकलेसाठी अ गट 6 ते 10 वयोवर्षे व ब गट 11 ते 16 वर्ष वयोवर्षे विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.


तर रविवारी दि.19 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता गुलमोहर रोड येथील आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालया समोर शिवकालीन वेशभूषा स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये 4 ते 8 वयोवर्षाचा गट राहणार आहे. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना स्पर्धा समाप्तीनंतर बक्षिस दिले जाणार आहे.

तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी या 8888125755 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *