• Fri. Mar 14th, 2025

शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी सतत पाठपुरावा करणारे बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार

ByMirror

Nov 9, 2022

सामाजिक जाणीव असलेल्या शिक्षकांची समाजाला गरज -सुभाष घोडके

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी सतत संघर्ष व पाठपुरावा करून विविध प्रश्‍न सोडविणारे व सामाजिक कार्याने आपला ठसा उमटविणारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांचा पाथर्डी शहरातील शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. फटाक्यांच्या आतिषबाजीत बोडखे यांचे स्वागत करून पाथर्डीचे प्रथम माजी नगराध्यक्ष सुभाषमामा घोडके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी नगरसेवक बजरंग घोडके, सहदेव दादा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेंद्र शिरसाठ, संचालक वसंत खेडकर, छबुराव फुंदे, अजय फुंदे, जायभाये सर, संजय शिरसाठ, आदिनाथ शिरसाठ, प्रल्हाद खाडे, महेंद्र राजगुरू, प्रा. सोणवणे, हर्षल घायतडक, बाळासाहेब तांबे, बाळासाहेब पिले आदींसह शिक्षक उपस्थित होते.


शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेंद्र शिरसाठ म्हणाले की, शिक्षक हा समाज घडविण्याचे कार्य करत असतो. बाबासाहेब बोडखे यांच्या सारख्या शिक्षकाने विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून समाजातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नेहमीच आधार दिला आहे. गरजू घटकातील विद्यार्थ्याला गरजेनूसार सर्व प्रकारचे शैक्षणिक मदत देऊन अनेकांना शाळेत जाण्यासाठी सायकलचे वाटपही केले आहे. कोरोना काळात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन निराधार, दिव्यांग व मतीमंद मुलांसाठी वर्षभर स्वखर्चाने त्यांची मदत सुरु असते. अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त भागातील पिडीतांसाठी अन्नधान्य व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत पाठविणारे नगरचे उपक्रमशील शिक्षक बोडखे यांचे कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.


शिक्षकांचे प्रश्‍न सुटे पर्यंत बोडखे यांचा सतत पाठपुरावा सुरु असतो. माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्येही संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी अभ्यासपूर्ण पद्धतीने ते काम करत असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. माजी नगराध्यक्ष सुभाषमामा घोडके म्हणाले की, बाबासाहेब बोडखे सरांचे कार्य कौतुकास्पद व सर्वांना दिशा देणारे आहे. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य सुरु आहे. सामाजिक जाणीव असलेल्या शिक्षकांची समाजाला खरी गरज आहे. सामाजिक भान ठेऊन शिक्षकांनी योगदान दिल्यास बदल घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

One thought on “शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी सतत पाठपुरावा करणारे बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार”
  1. बोडके सर म्हणजे , झुंजार व्यक्तिमत्त्व , निस्वार्थ रीतीने काम करणारे नेतृत्व आहे… सर अशीच जीवनामध्ये प्रगती करत रहा आमची तुम्हाला नेहमीच साथ राहील चांगल्या कामासाठी
    🥳🥳💐💐💐💐👏👏👏👍👍🤝🤝🤝🤝🤝 विजया प्रशांत गायकवाड युनियन ट्रेनिंग कॉलेज अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *