• Thu. Mar 13th, 2025

शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने

ByMirror

Apr 19, 2023

गोरक्षनाथ सोनवणे गुरुजी यांना जीवन गौरव पुरस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने गुरुजी गोरक्षनाथ मारुती सोनवणे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


लाखेफळ (ता. शेवगाव) येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सोनवणे यांना बबनराव ढाकणे सहकार साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. प्रताप (काका ढाकणे) व आबासाहेब काकडे समुहाचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, भाजप युवा मोर्चाचे अमोल गर्जे, राष्ट्रवादीचे शिवशंकर राजळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी ह.भ.प. फुंदे महाराज व ह.भ.प. डोंगरे महाराज यांचे प्रवचन झाले. शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार संचाचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे म्हणाले की, सोनवणे गुरुजी यांनी नेहमीच समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांचे कार्य सर्वांसाठी आदर्श व युवकांसाठी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सोनवणे गुरुजींच्या कार्यावर उजाळा टाकला.


या कार्यक्रमासाठी उषा अशोक शिंदे, मंगल अविनाश मगर, मराठा सेवा संघाचे विष्णू घनवट, डॉ. निरज लांडे, रा.प.प कर्मचारी अभिजीत आव्हाड, म्हसनजोगी समाज अध्यक्ष पोषाण्णा कडमिंचे, जमीर शेख, वसीम मुजावर, शफिकभाई शेख, सुनिल चव्हाण, राहुल भालेराव आदींसह शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *