श्रीराम नवमीनिमित्त सारसनगरला ज्येष्ठांची नेत्र तपासणी
तर युवकांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराला हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज आहे. यामुळे समाजाला व युवकांना दिशा मिळणार आहे. फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाचा मुद्दा हाताळू देणार नाही, हिंदुत्व ही एक अस्मिता असून ते जोपासण्याचे काम केले जाणार आहे. हिंदुत्व फक्त मतांच्या दृष्टीने पहाणार्या राजकारणींना संपूर्ण समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मयूर राऊत यांनी केले.

श्रीराम नवमी जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील सारसनगर, कानडे मळा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पुंड बोलत होते. प्रारंभी भगवान श्रीरामच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजू मामा पुंड, मयूर पुंड, सचिन रासकर, संतोष रासकर, दुर्गेश सानप, अनिकेत खाडे, रवी कानडे, विशाल शेंडे, दिनेश शेंडे, तेजस रासकर, सौरभ रासकर, अतुल मोरे, महेश व्यवहारे, कृष्णकांत रासकर, निलेश गाडळकर, नितीन बोरुडे आदींसह परिसरातील युवक व नागरिक उपस्थित होते.
मयूर पुंड यांनी गरजू घटकातील दृष्टीदोष असलेल्यांना नवदृष्टी मिळण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिराद्वारे वंचितांच्या जीवनातील अंधकार दूर होणार असून, गरजू रुग्णांचे प्राण देखील रक्तदानाने वाचू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू व काचबिंदू असलेल्यांवर शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे. तसेच रक्तदान करणार्या युवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.